हिंदूत्व फेअर अँड लव्हली क्रीम नहीं है, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल

देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा डांगोरा भाजपकडून सातत्याने पिटला जात आहे. त्यावरून कन्हैय्या कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Update: 2022-11-11 10:29 GMT

भारत जोडो यात्रा सुरु असताना भारत तुटलाच कुठं आहे? असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जातो. एवढंच नाही तर देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजप करत आहे. त्यावरून कन्हैय्या कुमार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच हिंदूत्व म्हणजे काही फेअर अँड लव्हली क्रीम नाही, असं मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केले.

मी मंदिरात गेलो त्यावेळी मला विचारलं की मंदिरात गेलात. पण मी गुरुद्वारात गेल्यानंतर मला कुणी विचारलं नाही की तुम्ही गुरुद्वारात का गेलात? त्यामुळे अशा प्रकारचं पर्सेप्शन तयार केलं जात असल्याचे कन्हैय्या कुमार यांनी सांगितले. त्यामुळे हिंदूत्व ही काही फेअर अँड लव्हली क्रीम नाही, असं मत व्यक्त केले. 

कन्हैय्या कुमार भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना म्हणाला की, भारताच्या फाळणीत हिंदू महासभेचा मोठा सहभाग होता. हिंदू महासभा आणि मोहम्मद अली जीना यांनी

जीनांच्या विभाजनकारी राजकारणासोबत हिंदू महासभेचा मोठा सहभाग होता. त्यामुळे इतिहास चुकीच्या पध्दतीने मांडून वर्तमानाचे अपहरण करत भाजप भविष्य अंधारात ढकलत असल्याचे म्हटले आहे.

याबरोबरच सध्या ज्या पध्दतीने राजकीय चर्चांतुन, कौटूंबिक व्हॉट्सअॅप गृपमधून नागरिकांचे मुलभूत प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत. तरुण महाराष्ट्रातील असो की बिहारमधील त्याचे भविष्य सरकारने अंधारात ढकलले आहे. तरुणांना आर्मीत नोकरी मिळत नसल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाला.

समाजात द्वेष, नकारात्मकता वाढत आहे. याबरोबरच गरीबी, महागाई, अस्पृश्यता यांच्या विरोधात सध्या लढण्याची आवश्यकता आहे. जर आपण आपापसात लढत राहिलो तर देश प्रगती कसा करणार असा सवाल कन्हैय्या कुमार यांनी केला.

देशातील भाषा, संस्कृती, राहणीमान हीच देशाची ताकद आहे. त्यामुळे या यात्रेत चालणाऱ्या महिलांनी हातावर आपण महिला अत्याचाराविरोधात चालावं, तरुणांनी रोजगारासाठी चालावं, शेतकऱ्यांनी आपल्या मालाला हमीभाव मिळावा, यासाठी या यात्रेत चालावं, असं मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केले.

Full View

Tags:    

Similar News