Gujrat-Himachal pradesh Election 2022 : निवडणूक आयोगाकडून परंपरेला छेद, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश या एकाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीची तारीख जाहीर केली. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.;
Gujarat-Himachal Pradesh Assembly Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोग (Election commission of india) ने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर केली. यानुसार 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र हिमाचल प्रदेश सोबत गुजरात विधानसभा निवडणूक होण्याची आजवर परंपरा आहे. मात्र यंदा निवडणूक आयोगाने परंपरेला छेद देत फक्त हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीची तारीख जाहीर केली. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (Himachal Pradesh Assembly Election 2022 announcement)
निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar )काय म्हणाले?
- एका राज्यातील निवडणूकीचा दुसऱ्या राज्यातील निवडणूकीवर परिणाम होऊ नये, त्यामुळे दोन्ही राज्यातील निवडणूकांच्या तारखा वेगळ्या
- हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि कडाक्याची थंडी असते. त्यामुळे कडाक्याची थंडी पडण्याआधी निवडणूक पुर्ण व्हावी, म्हणून घेतला निर्णय
- दोन्ही राज्यात सोबत निवडणूक घेतली असती तर आचारसंहितेचा कालावधी 70 दिवसांवर गेला असता. मात्र वेगवेगळ्या वेळी निवडणूका जाहीर झाल्यास हा कालावधी 57 दिवसांचा होईल.
- गुजरात विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये दोन टप्प्यात घेतली जाईल आणि मतमोजणी हिमाचल प्रदेशच्या मतमोजणी सोबत होईल.
वाद कोणत्या मुद्द्यांवर?
- निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commission rajiv kumar) यांनी सांगितल्याप्रमाणे एका राज्यातील निवडणूकीचा परिणाम दुसऱ्या राज्यातील निवडणूकीवर होऊ नये म्हणून वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या. मात्र उत्तरप्रदेश (Uttar pradesh) सह पाच राज्यांच्या निवडणूका एकाच वेळी का घेण्यात आल्या? असा सवाल करत वाद निर्माण झाला आहे. मात्र राजीव कुमार यांनी सांगितले की, या प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या कालावधीत 10 ते 15 दिवसांचे अंतर होते. त्यामुळे एकाच वेळी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, गोवा (Goa) विधानसभेचा कालावधी मार्चमध्ये तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कालावधी मे महिन्यात संपणार होता. त्यामुळे या दोन विधानसभेच्या कालावधीत 60 दिवसांचे अंतर होते. त्यामुळे या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे.
- हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. मग मतदान आणि मतमोजणी यामध्ये 26 दिवसांचे अंतर का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले नाही. (Himachal pradesh Election Date)
- गुजरातची निवडणूक डिसेंबर मध्ये होणार असल्यास 10-12 दिवसांनी निवडणूकीची घोषणा करावी लागेल. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने परंपरेला छेद देऊन असा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस(Congress) चा गंभीर आरोप
गुजरात मध्ये भाजप (BJP) ची सत्ता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना गुजरात (Gujrat) मध्ये मोठ-मोठ्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून निवडणूक आयोगाने दोन्ही निवडणूक एकत्र जाहीर केल्या नाहीत, असा आरोप काँग्रेस ने केला आहे.
काय आहे हिमाचल प्रदेश मध्ये पक्षीय बलाबल? (Himachal Pradesh party wise MLA)
हिमाचल प्रदेश विधानसभेत 68 जागा आहेत. त्यापैकी 2017 मध्ये भाजपने 44 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने 21 तर अपक्षांसह इतरांना 3 जागांवर विजय मिळाला होता.
55 लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.