#GujaratElections2022 : 'आप' चं फ्री वीज कार्ड गुजरातमध्ये करिष्मा करणार?
दिल्लीपाठोपाठ पंजाब जिंकल्याने आपचा विश्वास दुनावला आहे. त्यामुळे पंजाब पाठोपाठ आप गुजरातमध्येही करिष्मा दाखवणार का? अशी चर्चा रंगली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणूकीत करिष्मा केल्यानंतर आता गुजरातवर (Gujrat Assembly Election 2022) लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातच आपने (AAP)गुजरातमध्येही नागरिकांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये करिष्मा दाखवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा फ्री-कार्ड (AAP Free Card for Gujrat Election 2022)
अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दिल्ली (Delhi) आणि पंजाबमध्ये मोफत वीज देण्याचे आश्वासन देत निवडणूक जिंकली. त्यामुळे केजरीवाल यांनी गुजरात निवडणूकीसाठी पुन्हा मोफतचे आश्वासन दिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये प्रत्येक कुटूंबाला 300 युनिट मोफत वीज देण्यात येईल. (Free Electricity)गुजरातमधील नागरिकांना अखंड 24 तास वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबरोबरच 31 डिसेंबर 2021 पर्यंतची जुनी घरगुती वीज बीले माफ करण्यात येतील, असंही अरविंद केजरीवाल यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे फ्री-कार्ड गुजरातमध्ये चमत्कार करणार का? अशी चर्चा रंगली आहे.
अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये प्रचार सभेत कथित IB च्या रिपोर्टचा दाखला देत आप ला (Aam Aadmi Party)90 ते 95 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. मात्र 150 जागा जिंकण्यासाठी गुजरातच्या नागरिकांनी साथ देण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
भाजपची बलस्थाने कुठली ? (BJP Strong point in Gujrat)
गुजरातमध्ये अजूनही पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा कायम आहे. तसेच RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) चे नेटवर्क आणि भाजपची बुथ लेवलला असलेली प्रचार यंत्रणा ही भाजपची मजबूत बाजू आहे. तसेच 2017 च्या निवडणूकीत हार्दिक पटेल (Hardik Patel)ने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र हार्दिक पटेल भाजपमध्ये गेल्याने पटेल समुदायाचा कल भाजपच्या बाजूने झुकलेला दिसतोय. त्यामुळे हार्दिक पटेल, RSS चे नेटवर्क आणि भाजपची यंत्रणा ही भाजपची बलस्थाने आहेत.
काँग्रेसची वाट बिकटच ?
2017 च्या निवडणूकीत काँग्रेसने (Indian National Congress) जोर लावला होता. मात्र सत्ता मिळवण्यापर्यंत काँग्रेसला बहूमत मिळाले नाही. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या वादात आप बाजी मारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.