#GujaratElection : गुजरातमध्ये कॉंग्रेसचा धुव्वा ; भाजप दीडशे पार

Update: 2022-12-08 06:13 GMT

देशभर उत्सुकता असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपा (BJP) १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत.

एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रसिद्धीचा फायदा होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या भाजपाच्या हाती येतील. भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडणं त्यांना शक्य होणार नाही. इंदिरा गांधींच्या (indira gandhi) हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसला ही मतं मिळाली होती.

जपा १४९ जागांवर आघाडीवर असून ५३.६ टक्के मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर असून फक्त २६.६ टक्के मतं मिळाली आहेत. आपला एकूण १२.८ टक्के मतं मिळाली असून फक्त नऊ जागांवर आघाडी आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल (Gujarat Assembly Election 2022 Result)पाहता भाजपने एक्झिट पोल्सच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. सध्या भाजपने १५० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत. याचा मोठा फटका काँग्रेसला पक्षाला बसला आहे. एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसल पक्षाला ४०च्या आसपास जागा मिळतील, असे सांगितले जात होते. परंतु, आता काँग्रेस पक्ष २० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. यापूर्वी भाजपने गुजरात विधानसभेत सर्वाधिक १२७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा भाजपकडून हा विक्रम मोडीत काढला जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला जाण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असल्याचे दिसत आहे.

अमित शाह (Amit Shah)यांच्या संघटनात्मक कौशल्य आणि जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे गुजरातमध्ये भाजपा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी भारताला स्वयंपूर्ण करण्याचा, जगातील सर्वोत्तम देश कऱण्याचा प्रयत्न केला असून जनकल्याण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. सरकार आणि संघटनेने केलेल्या कामामुळे हा मोठा विजय मिळाला आहे. मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)म्हणाले .

२०१७ विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

भाजपा – ९९ (२०१२ च्या तुलनेत १६ जागा कमी)

काँग्रेस – ७७ (२०१२ च्या तुलनेत १६ जागा वाढल्या)

अपक्ष – ३ (२०१२ च्या तुलनेत २ जागा वाढल्या)

भारतीय ट्रायबल पार्टी – २

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – १ 

Full View



Full View

Tags:    

Similar News