अमरावती हिंसाचार : देवेंद्र फडणवीस यांना यशोमती ठाकूर यांचे सणसणीत उत्तर

Update: 2021-11-21 10:13 GMT

अमरावती आता शांत झाली आहे, बाहेरच्या लोकांनी येऊन इथे पुन्हा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, या शब्दात अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप केला होता, त्या सर्व आरोपांना यशोमती ठाकूर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.

अमरावतीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी झालेली घटना ही १२ तारखेच्या हिंसाचारावरील प्रतिक्रिया होती, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. केवळ हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमरावतीसह महाराष्ट्रात शांतता नांदायची असेल तर १२ तारखेला झालेल्या हिंसाचारामागे कट होता का, याची चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. एकप्रकारे फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा हिंसाचार होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. १३ तारखेला भाजपनेच अमरावती बंदची हाक दिली होती. विशिष्ट समुदायाच्या लोकांवर हल्ले होत असतील, दुकाने फोडली जात असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असे प्रक्षोभक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस यांच्या या सर्व आरोपांना यशोमती ठाकूर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. अमरावतीमध्ये १२ आणि १३ तारखेला झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल करुन कारवाई केली जात आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याने माहिती न घेता असे आरोप करणे खेदजनक आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीमध्ये आता शांतता प्रस्थापित झाली आहे, बाहेरुन येऊन कुणीही येथे पुन्हा तेढ निर्माण कऱण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News