गेहलोत-पायलट दोघेही पक्षाला हवेत पण... - जयराम रमेश

Update: 2022-11-27 09:57 GMT

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या सुरू असलेला वादची राजस्थानबाहेरही जोरदार चर्चा आहे. गेहलोत यांनी सचिन पायलट यांना देशद्रोही म्हटल्याने सुरू झालेला वाद वाढत चालला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही देशद्रोही अशा घोषणा देण्यात आल्या. आज इंदूरमध्ये भारत जोडो यात्रे निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कम्युनिकेशन सेलचे प्रमुख जयराम रमेश यांनी ''मी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे शब्द अनपेक्षित असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी हे शब्द वापरायला नको हवे होते, त्यांनी वापरलेले शब्द माझ्यासाठी अनपेक्षित होते आणि मला खूप आश्चर्य वाटले.' अशी व्यक्त केली.

राजस्थानच्या मुद्द्यावर मी तीनदा विधाने केली आहेत, आता चौथ्यांदा त्याची पुनरावृत्ती करत आहे. गेहलोत हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. सचिन पायलट हा आमच्या पक्षाचा तरुण, लोकप्रिय आणि उत्साही नेता आहे. आमच्या पक्षाला दोन्ही नेत्यांची गरज आहे. काही मतभेद आहेत, काही शब्द मुख्यमंत्र्यांनी वापरले होते जे अनपेक्षित होते. मलाही आश्चर्य वाटले असं मत आज जयराम रमेश यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

राजस्थानच्या बाबतीत संघटना बळकट करणारे उपाय नेतृत्व शोधून काढेल..

राजस्थानच्या बाबतीत जो काही तोडगा निघेल, त्यावर नेतृत्व पातळीवर चर्चा सुरू आहे. संघटना डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल होईल. व्यक्ती महत्वाची नसते, लोक येत-जात राहतात. ज्येष्ठ नेते आहेत, तरुण नेते आहेत पण संघटना सर्वोपरि आहे. संघटन बळकट करणारे उपाय नेतृत्व शोधून काढेल.

राजस्थानमध्ये गरज पडल्यास कठोर निर्णय घेतले जातील...

राजस्थानबाबत निर्णय घेण्याच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले की, राजस्थानबाबत मला जे काही म्हणायचे होते ते मी बोललो आहे. मी डेडलाइन सेट करू शकत नाही. ते काँग्रेस नेतृत्व ठरवेल. जो काँग्रेसला बळ देईल तो निवडून येईल. कठोर निर्णय घ्यावे लागले तर कठोर निर्णय घेतले जातील. तडजोड करायची असेल तर तडजोड केली जाईल. मी आधीच सांगितले आहे की एका बाजूला राज्य आणि केंद्र पातळीवर अनेक पदे भूषवलेले ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. दुसऱ्या बाजूला तरुण, लोकप्रिय, सक्रिय आणि तरुण नेता आहे. आम्हाला दोन्हीची गरज आहे.

राजस्थानातील प्रत्येक नेत्याला यात्रा यशस्वी होणार का? या प्रश्नावर बोलताना जयराम रमेश म्हणाले की, राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा यशस्वी होईल, राजस्थानच्या प्रत्येक नेत्याची आणि कार्यकर्त्याची भारत जोडो यात्रा यशस्वी व्हावी अशी इच्छा आहे.

Tags:    

Similar News