मोफत योजनांवरून केजरीवाल विरूद्ध नरेंद्र मोदी सामना

मोफत योजनांवरून केजरीवाल यांचा थेट केंद्र सरकावर निशाणा... वाचा काय म्हटलंय केजरीवाल यांनी...;

Update: 2022-08-11 14:02 GMT

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोफत योजनांच्या मुद्दयावरून आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. करदात्यांचा पैसा जातो कुठे असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेवर कर लादत आहे, मात्र श्रीमंतांसाठी तो माफ करत आहे. अशा शब्दात मोदी यांच्यावर थेट टीका केजरीवाल यांनी केली आहे.

अरविंद केजरीवाल हे निवडणूकांमध्ये लोकांना मोफत योजनांचं आश्वासन देतात आणि निवडणूका जिंकतात. यावरून भाजप सातत्याने केजरीवाल यांच्यावर टीका करत असते. आता पुन्हा एकदा यावरून केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलंय आहे केजरीवाल यांनी "गेल्या 75 वर्षांत सरकारने कधीही मूलभूत अन्नधान्यावर कर लावला नाही. पेट्रोल आणि डिझेलवरील कर 1000 कोटींहून अधिक आहे. सरकारच्या सर्व मोफत गोष्टी संपल्या पाहिजेत, सरकारी शाळा, हॉस्पिटलमध्ये फी घेतली पाहिजे, असे आता हे सांगत आहेत. मोफत रेशन बंद करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. केंद्राचा सर्व पैसा गेला कुठे? या सरकारी पैशातून ते आपल्या मित्रांचे कर्ज माफ करत आहेत. त्यांनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे करही माफ केले आहेत. मात्र जनतेला कर भरावा लागतो. केंद्राने वारंवार सांगितले की त्यांच्याकडे पैसा नाही, राज्यांना दिलेला पैसा कमी केला आहे. 2014 च्या तुलनेत कर संकलन खूप जास्त आहे पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. पैसा कुठे जातोय ? देशाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा केंद्र सरकार अग्नीपथ योजनेच समर्थन करताना सांगत आहे की, या योजनेमुळे संरक्षण कर्मचार्‍यांना पेन्शन द्यावी लागणार नाही.

अशा शब्दात केंद्र सरकारवर केजरीवाल यांनी टीका केली आहे. काय म्हटलं होती मोदी यांनी... केजरीवाल यांच्या मोफत योजनांवर पहिली टाकी मोदी यांनी 16 जुलैला बुंदेलखंडमधील एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनादरम्यान केली होती. पंतप्रधान मोदी यांनी या योजनांना "रेवड़ी संस्कृति" म्हटलं होतं, ज्या अंतर्गत मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देऊन मतदान मागितलं जातं. देशाच्या विकासासाठी ही पद्धत अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे मोदी यांनी म्हटलं होते.

यानंतर दिल्लीतील भाजप नेत्यांनी केजरीवाल यांच्या मोफत राशन योजनेवर टीका केली होती. केजरीवाल यांनी दिल्लीची तिजोरी लुटल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर केला होता. यावर केजरीवाल यांनी मोदी सरकारला आज उत्तर दिलं आहे.

Tags:    

Similar News