लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायद्याची गरज- देवेंद्र फडणवीस

RSS आणि भाजप सातत्याने देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी करत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा लागू करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.;

Update: 2022-10-12 04:32 GMT

भाजप आणि भाजपची मातृसंस्था RSS कडून सातत्याने देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच RSS च्या दसरा पथसंचलनाला संबोधन करताना मोहन भागवत यांनी विशिष्ट समाजाची लोकसंख्या वाढत असल्याचे वक्तव्य केले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायद्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर या कार्यक्रमात बोलत होते.

लोकसंख्येच्या नियंत्रणाच्या दृष्टीकोणातून देशात व्यवहारिक पातळीवर सर्वसमावेशक कायदा करण्याची गरज आहे. त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी लोकसंख्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या चीनी धोरणाचा पुरस्कर्ता नाही. ज्यामध्ये एकच मुल असावे किंवा नसावे, असे धोरण आहे. मला वाटतं, की भारतासाठी लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वसमावेशक धोरण असायला हवे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी समान नागरी कायद्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहीली. त्यावेळीही घटनेत समान नागरी कायदा अभिप्रेत होता. तसेच गोवा राज्यात आणि उत्तराखंड राज्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा असल्याचेही मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 

Tags:    

Similar News