पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं? पूरग्रस्त नागरिकांचा संतप्त सवाल

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱ्यावर असतांना स्थानिकांनी त्यांच्याशी चांगलाच वाद घातला पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, असा संतप्त सवाल पूरग्रस्त भागातील नागरिकांनी उपस्थित केला.;

Update: 2021-07-30 05:20 GMT

 पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱ्यावर असतांना स्थानिकांनी त्यांच्याशी चांगलाच वाद घातला पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, असा संतप्त सवाल पूरग्रस्त भागातील नागरिकांनी उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत मदतीचे आश्वासन दिले.

"दरम्यान यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हा पाहणी दौरा नाही तर हा मदत दौरा आहे. आता मदतकार्य सुरु झाले आहे. त्यामुळे सरकारकडून मदत दिली जाईल.", असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान "ही वेळ राजकारण बाजूला ठेऊन सगळ्यांनी मिळून लोकांसाठी काम करण्याची आहे, तसंच काम आम्ही करत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जाईल. मात्र, सध्या नागरिकांचे दैनंदिन जनजीवन पुर्ववत करण्याकडे सरकारने प्राधान्य दिले आहे. असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

पंचनामे झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी मिळल्यानंतरच मदतीच्या पॅकेजबाबत निर्णय घेतला जावा असे सर्वांचे मत आहे. तोपर्यंत पूरग्रस्तांना तातडीने मदतीचे वाटप करण्यात यावे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News