गारपीटीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही; अध्यक्ष महोदय आदेश काढा - अजित पवार
सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले.;
राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान तुम्हाला हक्क, अधिकार मागण्या मागायचा आहे परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत असे आवाहन अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले. गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे.
फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल. शेतकरी (farmer) अडचणीत आले आहेत. आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.
काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. गारपीठीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. संप सुरू आहे. पंचनामे करायला कोण नाही.
महसुल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी. आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तात्काळ निर्णय करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी केली. आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि धनंजय मुंडेनीही (Dhananjay Munden) या प्रश्नावर लक्ष वेधले. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या निवेदनावर समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी अखेर सभात्याग केला.