जागा झालेला हिंदू खतरा भी बन सकता है। - उध्दव ठाकरे

Update: 2023-02-19 13:30 GMT

काल पुण्यात कोणी आलं होतं (अमित शाह), त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते (अमित शाह) म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे.

मुंबईत आयोजीत उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी उध्दव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यावेळी ओपन चॅलेंजं दिलं.

Full View

उद्धव ठाकरे म्हणाले, “काल त्यांनी माझा धनुष्यबाण हिसकावून घेतला, आता स्वत: प्रभूरामचंद्र माझ्यासोबत आले आहेत. हा योगायोग म्हणावा की आणखी काय माहीत नाही. परंतु असं कधीकधी अशा गोष्टी होत असतात. मी तर काल रस्त्यावर उतरून आव्हान दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला आहे, त्यांना मी आव्हान दिलं आहे की जर तुम्ही मर्द असाल, तुमच्याच हिंमत असेल तर तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या, मी माझी मशाल घेऊन समोर येतो पाहूयात काय होतं?”

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर सडेतोड टीका करत ठाकरे म्हणाले, एक गोष्ट नक्की की मागील २५-३० वर्षांपेक्षाही जास्त तुम्ही आणि आम्ही एकमेकांचे विरोधक होतो. काँग्रसे, राष्ट्रवादी आणि शिवसेना. मी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीय नाही म्हणत. मग असं काय घडलं की आम्ही तर हिंदुत्ववादी होतो, आजही मी म्हणतो की मी हिंदू आहे. मी हिंदुत्व कधी सोडले नाही आणि सोडणारही नाही. मी तर भाजपाला सोडलंय हिंदुत्व नाही सोडलं, असा पुनरोच्चार ठाकरेंनी यावेळी केला.

भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व नाही. ते आम्हाला मान्य नाही मी उघडपणे सांगतो. जे माझ्या वडिलांनी मला शिकवलं ते हिंदुत्व हे नाही. माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. आमचं जे हिंदुत्व आहे ते देशाची जुडलेलं आहे. परंतु यांचं हिंदुत्व सांगतं की आपसात भांडणं लावा, कुटुंबात भांडणं लावा, पक्षात भांडणं लावा आणि सत्ता मिळवा.” असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

अमित शहांवर थेट टीका करत ठाकरे म्हणाले, काल पुण्यात आल होत कुणीतरी म्हणाले शिवसेनेचे धनुष्य आम्ही गद्दारांना दिले मोगँबो खुश हुआ. हेच त्यांना पण हव होत. मला लोकांच्या सोबत यायचे आहे. मी कधीच भेदभाव केला नाही मुख्यमंत्री असतांना पण. इथे उपस्थित जे आहेत तेच १९९२-९३ साली मुंबई वाचवण्यात होते तेच आज गुन्हेगार ठरवता. भाजपने मला काँग्रेसकडे जाण्यास भाग पाडले. मी तर आजही हिंदूच. २०१४ साली त्यांनी युती तोडली. एकटा लढलो ६३ आमदार निवडून आणले. नंतर अमित शहा घरी आले. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल हे माझे आजही वचन आहे. अमित शहा ठीक है म्हणाले मग काय झाले ते सर्वश्रुत असे ठाकरे म्हणाले.

आमच्या पोस्टरवर मोदी होते, पण त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो होते. आज जे सुरू आहे ते तुम्हाला तरी पटतय का? जनतेला ठरवू द्या. केंद्रीय यंत्रणा अश्या लबाड लांडग्यांना सोडून मग म्हणतात मै एकेला लढतोय. एक स्वप्न बघून त्यांना तिथे बसवल ते बलवान झाले देश कमकुवत होतोय. मुंबई, महाराष्ट्र हा केवळ माझा हेतू नाही देश वाचायला हवा. बुध्दिबळात पण नियम आहे आज कोणी कसाही चालतय, असं ठाकरेंनी यावेळी सांगितले.

प्रमोद महाजनांना बाळासाहेबांनी हिंदू म्हणून मतदार तयार होईल असे भाकीत केले होते. आता हिंदू जागा झाला तर भाजप धूळफेक करताहेत. कधी हिजाब, कधी अजून काही. तुमचे सरकार असतांना हिंदू जनाक्रोश मोर्चा का काढवा लागतो. मुस्लिम, उत्तर भारतीय कुणाच सोबत आमचे भांडण नाही जोवर आपला देश तुम्ही मातृभूमी मानतात तोवर आपण सगळेच भाऊ आहोत. मला यायला उशीर झाला कारण काही उत्तर भारतीय बांधव आले होते. काश्मीर सैन्यातील औरंगजेबाची अतिरेक्यांनी हत्या केली. त्याने देशासाठी जीव दिला तो आमचा भाऊच, असं ठाकरेंनी सांगितले.

काल मोगँबो म्हणाले आम्ही पाय चाटले, गद्दार त्यांचे काय चाटताहेत माहिती नाही. बोहरा समाजाने बोलावले मी गेलो दिखावा नाही केला. पोळ्या नाही लाटल्या. मला प्रेमाने बोलावले मी गेलो जुने संबंध. मुफ्ती मोहम्मद सोबत गेले तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व.ज्यांना जायचे ते जाऊ शकतात पण त्यांनी इतर पक्षात जायला हवे होते. शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केले तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको. मी काय वाईट केल तुमच्यासोबत. मी भाजपला मुख्यमंत्री पद मागितले. मला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण पवार साहेब म्हणाले. भाजपने अडीच वर्ष त्यांनी वचन पूर्ण केले असते तर आज हे सगळ करायची गरज नव्हती. पण बरं झाल जे झाल आज जनतेत रोष आहे असं ठाकरे म्हणाले.

काँग्रेसचे चिन्ह पण गोठवले नाव आणि मूळ चिन्ह कुणालाच दिले नव्हते. मी जसा आहे तसाच लोकांसमोर आहे. नीच राजकारण सुरु कदाचित मशाल पण परत घेतील. सत्ता, शक्ती, धनुष्यबाण तुमच्याकडे पण लोकांच्या मनातला राम तुम्ही घेऊ शकणार नाही. आता मुंबई गुलाम करायची त्यांची तयारी. २५ वर्षे मला मुस्लिम, उत्तर भारतीयांनी पण मदत केली. आज शिवसेनेचे मुस्लमान नगरसेवक. तोट्यातील मुंबई मनपा फायद्यात आणली आणि हजारो कोटींच्या ठेवी उभ्या केल्या. सगळ्या ठेवी या खर्च करायचा नाहीत कारण कामगार, निवृत्ती वेतनाचे आहेत. आम्ही त्याच पैशातून टोल फ्री कोस्टल रोड बनवतोय. भाजपचा डोळा ठेवींवर. मी आणि अजितदादा असतांना जीएसटी थकीत ठेवला मुंबईचा. उद्योग मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेर नेतायत. त्याच्या आड उध्दव ठाकरे येतोय म्हणून आम्ही नको. माझ्या हातात आज फक्त माईक मी मनापासून बोलतो. प्रत्येक संकटात तुम्हाला सोबत राहावे लागेल.

कोविड काळात लाॅकडाऊन अगोदरच काही दिवस हळूहळू मी काही निर्बंध सुरु केले. मी केंद्राला रेल्वे द्या आम्ही पैसे देऊ म्हणालो. काही लोकांना आपल्या राज्यात परत जायचे होते पण केंद्राने टाळाटाळ केली. तरी मुख्यमंत्री म्हणून महिनाभर लाखो परप्रांतीय बांधवांना आम्ही जेवणाची सोय केली. साडे सात लाख लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर मविआ सरकाने पोचवले. आपण सुखात दुखात सोबत. आपण मनाने खचू नये वय वाढले तरी चालेल. तसेच आजचे दुबेजी आहेत. अशी लोक सोबत आहेत. प्रत्येक नागरिकाची ही लढाई. लोकशाही जिवंत राहणार की नाही अशी वेळ आलीय. आपण एकत्रित असलो तर कुणी गुलाम बनवू शकणार नाही. गेल्या रविवारी पण मी भेटलेलो. तुम्ही म्हणाल तिथे मी भेटायला येईल. आपण एकत्र आलो तर निवडणुकीत का वेगळे राहायचे?

काल अमित शहा म्हणाले दूध का दूध पानी का पानी झाले म्हणाले पण त्यांनी दुधात मीठ घातले. त्याच दुधात साखर टाकण्यासाठी तुमची साथ हवी आहे. काही असेल तर लगेच आपण चर्चा करुयात, असं उध्दव ठाकरे शेवटी म्हणाले. 

Tags:    

Similar News