अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ; कॉंग्रेसचा मात्र इन्कार

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-09-02 13:41 GMT
अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ; कॉंग्रेसचा मात्र इन्कार
  • whatsapp icon

माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपात जाणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. चव्हाण यांच्यासह 12 काँग्रेसचे आमदारही भाजपात जाणार असल्याची चर्चा संध्या रंगली आहे.

शिवसेनेत बंडाळीनंतर कॉंग्रसमधेही अस्वस्थता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची चर्चा आहे.दोन्ही नेत्यांनी भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगितले असले तरी चर्चांना मात्र उधाण आलेले आहे. काँग्रेसमधील अनेक काँग्रेसचे आमदार नाराज असून, त्यातीत अशोक चव्हाणांना मानणारे 12 आमदार त्यांच्यासोबत भाजपातजातील अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहे. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांना विनंती आहे त्यांनी हे थांबवावे, कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगत या वृ्त्ताचा इन्कार केला आहे.

Tags:    

Similar News