प्रत्येक भारतीय कर्जबाजारी, डोक्यावर एक लाख 9 हजार रुपयांचं कर्ज, काँग्रेसचा दावा
देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच देशातील प्रत्येक नागरिकावर 1 लाख 9 हजार रुपयांचे कर्ज असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.;
देश महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) यासारख्या समस्यांशी झुंजत असतानाच देशातील प्रत्येक नागरिकावर 1 लाख 9 हजार 373 रुपयांचे कर्ज ( असल्याची आकडेवारी काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी पुढे आणली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी गौरव वल्लभ म्हणाले, सध्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 1 लाख 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण हे कर्ज तुम्ही घेतले नाही. हे कर्ज सरकारने घेतले आहे. पण या कर्जाचा बोजा प्रत्येक व्यक्तीवर आहे.
2014 मध्ये देशावर 55 लाख कोटींचे कर्ज होते. मात्र त्यामध्ये वाढ होऊन ते आता 155 लाख कोटींवर पोहचले आहे. मात्र या कर्जाचा उपयोग विकासकामांसाठी केला असेल, असं अनेकांना वाटू शकते. पण हे कर्ज प्रत्येक व्यक्तीवर असतानाही या कर्जाचा फायदा देशातील सामान्य लोकांना मिळत नाही. कारण नोटबंदीमुळे देशातील नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली. त्यानंतर जीएसटीमुळे आणखी खाली आली. मात्र दुसरीकडे ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार सद्यस्थिती समोर आली आहे. देशातील 5 टक्के लोकांकडे देशातील 60 टक्के संपत्तीचे केंद्रीकरण झाले आहे. तर 50 टक्के लोकांकडे देशाची अवघी 3 टक्के संपत्ती आहे.
देशातील 3 टक्के लोक हे 64 टक्के जीएसटी देतात. मात्र ज्यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे, असे लोक फक्त 3 टक्के GDP देतात, असा दावा गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषदेतून केला.