निवडणुक आयोग कायद्याचे पालन करुन आम्हाला न्याय देईल, असा विश्वास असल्याचे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत व्यक्त केले.
ती भाजपचीच रॅली होती. तो काही हिंदू जनआक्रोश वगैरे नव्हता. लोकांचा असा गैरसमज आहे की तो मोदींच्या विरोधातील आक्रोश होता. खरतर भाजपमध्ये मोदी, शहा, फडणवीस यांच्या सारखे कडवट नेते असताना लव-जिहाद होत असेल तर हे योग्य नसल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. तेंव्हा यांच्या तोंडाला वेसळ लागते.
काश्मिरचा झालेला अपमान यांना चालतो. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान केला जात नाही. हे चालते तेंव्हा यांच्या तोंडून एकही शब्द निघत नाहीत. याला काय म्हणायचे. मोर्चा काढला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मोदी आणि शहा यांच्या विरोधात त्यांनी जो आक्रोश केला. आज ही हजारो कश्मिरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की आज न्याय होईल. आम्हाला विश्वास आहे की, न्याय आणि कायदा हे देशाचे संविधानाचे पुर्ण पालन करुन निवडणुक आयोग आम्हाला न्याय देईल, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.