एकनाथ शिंदे यांचे कुटुंब शपथविधीसाठी निघाले
राजभवन येथे सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले.;
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर लुईस वाडी परिसरात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांचे कुटुंब निवासस्थानावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या ठाण्यातील घराच्या बाहेर फटाके फोडून दिवाळी साजरी केली.
त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे, वडील संभाजी शिंदे, श्रीकांत शिंदे यांची पत्नी वृषाली शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा नातू रूद्र श्रीकांत शिंदे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांचे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.