मिलिंद नार्वेकर बंडखोरांच्या गटात गेल्याची चर्चा? सत्य आले समोर

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा मात्र सत्य आले समोर

Update: 2022-07-03 06:48 GMT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. त्यातच उध्दव ठाकरे यांचे अनेक विश्वसनीय लोक शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेत खळबळ उडाली होती. तर मिलिंद नार्वेकर हे सुध्दा शिंदे गटात सहभागी झाल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चांना आता अखेर पुर्णविराम मिळाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यानंतर उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय लोक शिंदे गटात सहभागी झाले. दरम्यान शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर हे सुध्दा शिंदे गटात सहभागी चर्चा सुरू होती. तर मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात सहभागी झाल्यास तो उध्दव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसला असता. मात्र आता मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत का? याबाबतचे सत्य समोर आले आहे.

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात तसेच मिलिंद नार्वेकर यांना मंत्रीपद असे वृत्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र वास्तव समोर आले आहे. 




 


गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. तर शिंदे गटात सहभागी झाल्यास उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असता. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या आई रुग्णालयात आयसीयूमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात सहभागी झाल आहेत का? अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर यांच्या आई रुग्णालयात असल्याने मिलिंद नार्वेकर अनुपस्थित असतात, असे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी ट्वीट केले आहे.

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत वृत्त प्रसारित केले होते. मात्र आता सत्य समोर आले आहे. 

Tags:    

Similar News