शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार? अमोल मिटकरी यांचं मोठं विधान

राज्यात स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेपासूनच विरोधकांकडून सरकार कोसळण्याविषयी भाष्य केले जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार याविषयी भाष्य केले आहे.;

Update: 2022-08-29 05:02 GMT

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुप्रीम कोर्टात तारखेवर तारीख दिली जात आहे. त्यामुळे सरकार टिकणार की राहणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केले आहे. अमोल मिटकरी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी आयोजित केलेल्या संवाद यात्रेत बोलत होते.

यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं असलं तरी ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, त्या दिवशी शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि त्यादिवशीच महाराष्ट्राती शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल.

पुढे बोलताना अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांची मिमिक्री केली. यावेळी अमोल मिटकरी यांनी तोतरं बोलत किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली. तसेच यशवंत जाधव भाजपमध्ये गेले. तर भावना गवळी यांनी हातातील शिवबंधन बाजूला काढून मोदींना राखी बांधली, असं म्हणत ईडीच्या भीतीने शिंदे गटातील नेते भाजपमध्ये गेल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली.

Tags:    

Similar News