एक नोटीस आली आणि लेंडी पातळ झाली, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथील नेस्को पार्क येथे तर उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात सभेचे आयोजन केले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Update: 2023-06-19 18:36 GMT

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे राम मंदिराचे (Ram Temple) काम सुरु आहे. 370 कलम (remove Article 370) हटलं. त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न साकार केलं. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती केली. त्यामुळे गद्दारी कोणी केली आम्ही की तुम्ही? गद्दार कोण? बेईमान कोण? विश्वासघाती कोण? ही जनता ठरवेल. कारण जनता सुज्ञ आहे.

यापुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कालच्या भाषणात मोदी आणि शहा (Modi And Shaha) यांना काय काय शिव्या दिल्या. हिटलर (Hitler), अफजल खान (Afjal Khan) म्हटले. पण विचार करा ते कुठे तुम्ही कुठे? एक नोटीस आली आणि लेंडी पातळ झाली तुमची. हे आम्हाला सर्व माहिती आहे. बाळासाहेबांची पुण्याई आहे मर्यादेत रहा. आपल्या कुवतीत रहा, असा एक गर्भित इशारा शिंदे यांनी दिला.

Full View


हे ही पहा- आपल्याला शत्रू संपवायचा आहे, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना थेट इशारा

Full View

Tags:    

Similar News