एकनाथ शिंदे गट उद्या राज्यात परतणार

Update: 2022-06-29 06:56 GMT

राज्यपाल भगतसिंद कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टात यावर सकाळी सुनावणी झाली. कोर्टाने सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश देत संध्याकाळी ५ वाजता सुनावणी ठेवली आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदार गुवाहाटीतील कामख्या देवीच्या मंदिरात सकाळीच दर्शनासाठी गेले. त्यानंतर सर्व आमदार महाराष्ट्रात परतणार असून राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशानुसार आम्ही उपस्थित राहणार आहो, तसेच पुढील प्रक्रिया करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट आज राज्यात परतणार नसून गोव्यामधील हॉटेलमध्ये राहणार आहे, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांसह मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच शिवसेनेचे ३९ आमदार महाराष्ट्राबाहेर आहे, त्यांन सरकारमध्ये रहायचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यानंतर राज्यपालांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना गुरूवारी संध्याकाळपर्यंत बहुतम सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:    

Similar News