राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गुरूवीरी चार तासापासून जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात ही आंदोलनाला बसले होते. जिल्हा दूध संघातील अपहर प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. चार तास उलटूनही गुन्हा दाखल होत नसल्याने एकनाथ खडसे यांनी चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा अशी विनंती केली.
जिल्हा दूध संघातील एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला असून या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी खडसे तब्बल चार तासांपासून जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात या आंदोलनाला बसले आहे.
एकनाथ खडसेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे तर दुसरीकडे कायदेशीर बाबी चे कारण पुढे करत पोलीस अधिकारी समजूत घालत आहेत. तसेच चौकशी आणखी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन घेत आहेत मात्र खडसे मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मी आज मेलो तरी गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही असेही एकनाथ खडसे यांनी ठणकावून पोलिसांना सांगितले. ब्लड प्रेशर तसेच मधुमेह असल्याने प्रकृती लक्षात घेता एकनाथ खडसेंची डॉक्टर बोलून जागीच ब्लड प्रेशरची तपासणी करण्यात आली.