एकट्या मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे का? एकनाथ खडसे यांचा सवाल

Update: 2022-12-21 14:03 GMT

गेल्या काही महिन्यात फक्त मुंबई आणि ठाणे शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली जात आहे. मग एकट्या मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत केला.

विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी काय योजना आहे? विदर्भ वेगळा मागण्याचं काम पहिल्याच दिवशी या भागातील नागरिकांनी केलं. ही विकासातील तूट वाढत गेली तर मग का मागणार नाहीत वेगळा विदर्भ? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.

विधान मंडळाच्या परवानगीशिवाय एक पैसाही खर्च करता येणार नसल्याचा नियम आहे. पण सध्या आपल्या सोयीनुसार नियम वापरले जत असल्याचा आरोप खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

वेगळा विदर्भ होऊस्तोवर मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण आता लग्न झालं आणि मुलंही झाले, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी टोला लगावला. अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून खडसे यांनी सरकारला धारेवर धरलं. एवढंच नाही तर गुन्हा नोंद करण्यासाठी अधिकारी धजावत नसल्याचा आरोप यावेळी खडसे यांनी केला. बलात्काराचा गुन्हाही नोंद करण्याऐवजी अनेक प्रश्न विचारून पीडितेला हैराण केलं जातं, असंही यावेळी खडसे म्हणाले.

Tags:    

Similar News