एकनाथ खडसे यांची शिवसेनेला धोबीपछाड, बाजार समितीवर एकहाती वर्चस्व

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे.;

Update: 2023-04-30 16:02 GMT

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड बाजार समितीचा गड कायम राखण्यात यश मिळाले आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या पॅनलने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे याठिकाणी एकनाथ खडसे यांची एकहाती सत्ता आहे.

भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. गेल्या पंचवीस वर्षांची बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता राखण्यात खडसे यांना यश आले आहे. यानंतर एकनाथ खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनी गुलाल उधळत मिरवणुकीत ठेका धरला.

बोदवड बाजार समिती येथे भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात खडसेंच्या पॅनलने आघाडी मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. बोदवड बाजार समितीवर गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व कायम आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम असल्याचे या निकालातून दिसून आले आहे. मोठ्या फरकाने महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत धूळ चारली आहे.या निवडणुकीत भाजप शिवसेनाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी प्रचारापुसन दूर होते. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींवर निवडणुकीची जबादारी देण्यात आली होती.

Tags:    

Similar News