शिवसेनेतील गटनेते आणि मुख प्रतोद पदाबाबत सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असतानाच राष्ट्रवादीने विधानपरिषदेत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाची निवड केली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेतील गटनेते आणि मुख्य प्रतोद पदावरून युक्तीवाद सुरू आहे.
त्यापार्श्वूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. तर मुख्य प्रतोद पदावर अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली.