बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ईडीची पुन्हा कारवाई
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ईडीने पुन्हा कारवाई केली आहे. अविनाश भोसले यांची तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ईडीने पुन्हा कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांनाही याआधीही समन्स पाठवला होता. आता ईडीने अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे.अविनाश भोसले यांची तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
Enforcement Directorate has Provisionally attached immovable assets worth Rs.4 Crore of M/s. ARA Properties (ABIL group company) under PMLA, 2002.
— ED (@dir_ed) August 9, 2021
पुण्यातील सरकारी जागेवर बांधकाम व्यवसायिक भोसले यांनी बांधकाम केले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. भोसले कुटुंबीयांचे पुणे, नागपूर, गोवा याठिकाणी तारांकित हॉटेल्स आहेत. सोबतच दुबईच्या एका मोठ्या कंपनीत भोसले यांची गुंतवणूक देखील आहे. भोसले यांची ईडीकडून सप्टेंबर 2017 पासून चौकशी सुरू होती. भोसले यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात 1 कोटी 15 लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हणत ईडीने भोसले यांची चौकशी केली ज्यात भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली 40 कोटी 43 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.