संजय राऊत हाजिर हो, ED चे तिसऱ्यांदा समन्स
संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स जारी करत बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत ईडीसमोर हजर राहणार का? ही उत्सुकता ताणली गेली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आलं आहे. त्यातच संजय राऊत यांना हे तिसरे समन्स जारी करण्यात आल्याने ते चौकशीला हजर राहणार की नाही?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स पाठवले होते. मात्र त्यावेळी संजय राऊत हे चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने 1 जुलै रोजी दुसरे समन्स पाठवले. त्यावेळी संजय राऊत यांची सलग 10 तास ईडीकडून चौकशी सुरू होती. मात्र यानंतर संजय राऊत यांना ईडीने तिसरे समन्स पाठवले आहे. परंतू संजय राऊत हे सध्या दिल्लीत असल्याने ते चौकशीला हजर राहणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत यांनी 1 जुलै रोजी झालेल्या दहा तासांच्या चौकशीदरम्यान हा प्रकल्प दहा वर्षापासून रखडला असतानाही संजय राऊत यांनी ईडीच्या प्रश्नांना नकारात्मक उत्तरं दिले होते. तसेच ही पत्राचाळ कुठं आहे? असं उत्तर राऊत यांनी दिले होते. त्यावरून पत्रा चाळ नाही तर मग घोटाळा झाला नाही का? असा सवाल ईडीने विचारला होता. मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी चौकशीला पुर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. मात्र सध्या संजय राऊत दिल्लीत असल्याने ते पुन्हा एकदा वकीलामार्फत मुदत वाढवून देण्याची मागणी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.