ED कडून आज सचिन वाझेचीआमने-सामने चौकशी

Update: 2021-07-12 06:02 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवून देणाऱ्या सचिन वाझे (sachin waze) प्रकरणामागे आता सीबीआयनंतर सक्तवसुली संचलनालय (ED) हात धूवून मागे लागलं आहे. सलग दोन दिवस कठोर चौकशीनंतर आज ईडी माजी मंत्री अनिल देशमुख (anil deshmukh)यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या समोरोसमोर चौकशी करणार आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात पहिल्यांदा सचिन वाझे प्रकरणाला वाचा फुटली होती. या वादाचे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh)पडल्यानंतर प्रकरण थेट हायकोर्टात (high court)गेल्यानं गृहमंत्री अनिल देशमुख यांना पायऊतार व्हावे लागले.

सीबीआय (CBI) पाठोपाठ ईडीने १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणाची चौकशीचे फास आवळल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए सचिव संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना अटक झाली होती. चौकशीत वाझेनी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बामालकांकडून 4 कोटी ७० लाख रुपये वसूल करून दोन हप्त्यांमध्ये शिंदे यांच्याकडे दिले होते, अशी कबुली शिंदे आणि पलांडे यांनी दिल्याचा दावा ईडीने केला आहे.. अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे असंही वाझेनं आपल्या जबाबात म्हटलं होतं. या जबाबानुसार वाझेची चौकशी करायची असल्यानं तुरुंगात जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज ईडीने केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केल्यानंतर कोर्टाच्या नियमाप्रमाणे दोन दिवसाची चौकशी पार पडली आहे.

मुंईतील बारमालकांकडून केलेली हप्ता वसुली आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सलग दोन दिवस चौकशी पार पडली आहे. ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना आज त्याच्यासमोर बसवून विचारणा करण्यात येणार आहे. प्राथमिक अहवालावरून ईडीने  मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व कारमधील स्फोटके व हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी वाझेकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सहा तास चौकशी केली होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने रविवारी सकाळी पुन्हा पथक तळोजा जेलमध्ये पोहोचले. वाझेकडे सुमारे चार तास चौकशी केली आहे.

चालकांकडून दर महिना १०० कोटी वसूल करून देण्याचे टार्गेट देशमुख यांनी दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.  या प्रकरणाचा तपास दोन, अडीच महिन्यांपासून देशमुख आणि त्यांच्या दोघा पीएच्या भोवती सुरू होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची व्याप्ती वाढवून तत्कालीन आयुक्त आणि इतरांच्या जबाबदारी निश्चित करण्याची सूचना देखील सीबीआयला केल्या आहेत. आज होणार्या आमने सामने चौकशीतून काय बाहेर पडणार आणि ईडीमुळे अनिल देशमुख आणि पर्यायानं महाविकास आघाडीचे पाय किती खोलात जाताहेत? हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News