राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट? अजित पवार यांनी केला खुलासा

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना ईडीने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दाखवल्या होत्या. मात्र यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे.;

Update: 2023-04-13 03:47 GMT

राज्य सहकारी बँकेतील कर्ज (State Co-operative Bank) आणि साखर कारखाने विक्री प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केल्याची चर्चा सुरु होती. मात्र या आरोपपत्रात अजित पवार यांचे नाव नसल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या. त्यामुळे अजित पवार (Ajit pawar) भाजपच्या वाटेवर असल्यानेच त्यांना क्लीनचीट देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. (Ajit pawar clean chit)

जरंडेश्वर सहकारी कारखान्याची (Jarandeshwar co-operative Sugar Factory) खरेदी करताना राज्य सहकारी बँकेच्या कर्जप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट दिल्याची चर्चा बुधवारी रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये अजित पवार म्हणाले, काही प्रकरणांमध्ये माझी चौकशी सुरु आहे. यामध्ये मला कुठलीही क्लीनचीट मिळाली नाही. (Ajit pawar comment on viral News on clean Chit)

चार दिवसांपुर्वी अजित पवार यांच्या बंडाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी खुलासा केला. मात्र यानंतर बुधवारी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच अनेक राजकीय विश्लेषकांनी अजित पवार बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांना ईडीने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे सुरु असलेल्या राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मला कुठल्याही प्रकरणात क्लीनचीट मिळाली नाही. माझी चौकशी सुरूच असल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News