ED ची कारवाई ही राज्याच्या अधिकारावर गदा – शरद पवार

Update: 2021-09-07 09:02 GMT

देशात गेल्या २-३ वर्षात ED ही नवीन यंत्रणा देशातील लोकांच्य़ा परिचयाची झाली आहे, ED कधी कुणाच्या मागे लागेल ते सांगता येत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. राज्यातील यंत्रणा असताना ईडीने कारवाई करणे हा राज्याच्या अधिकार घाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलतांना शरद पवार यांनी ही टीका केली आहे. भावना गवळी यांच्या ३ संस्था आहेत, तिथे काही घोटाळा झाला असेल तर राज्यातील यंत्रणा त्याचा तपास करु शकतात, पण विरोधकांच्या नेत्यांच्या मागे ईडी लावण्याचा प्रकार गेल्या काही दिवसातच सुरू झाल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच वेळ जात-येत असते, ती वेळ गेली की यात दुरूस्ती केली जाईल असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News