उन्हाच्या तडाख्यात कर्नाटकमधे विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम

राहुल गांधीं यांची रद्द झालेली खासदारकीवरुन रणकंदन सुरु असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.

Update: 2023-03-29 09:10 GMT

राष्ट्रीय राजकारणात सुरु असलेल्या आरोप आणि प्रत्यारोपाच्या चर्चेत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि त्यांची रद्द झालेली खासदारकीवरुन रणकंदन सुरु असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. १० मे रोजी एका टप्प्यात कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होऊन १३ मे रोजी निकाल लागणार आहेत.

Full View

२२४ जागांसाठी होणार मतदान

कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे.

या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील. १३२० मतदान केंद्र पूर्णपणे महिलांकडून सांभाळली जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना – १३ एप्रिल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल

अर्ज छाननी – २१ एप्रिल

अर्ज माघारी घेण्याची मुदत – २४ एप्रिल

मतदानाची तारीख – १० मे

मतमोजणी आणि निकालाची तारीख – १३ मे

Tags:    

Similar News