कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच प्रदीर्घ काळ केंद्रीय मंत्री राहीलेले गुलाम नबी आझाद यांनी हे गेल्या काही काळापासून काँग्रेसच्या सक्रीय राजकारणापासून दुर होते. शुक्रवारी २६ ऑगस्टला अखेप त्यांनी पक्षातील सर्व सद्सयत्वाचा तसेच पदांचा राजीनामा दिला. पण आपल्याला ठाउक आहे का की काश्मिरचे मुख्यमंत्री राहीलेले गुलाम नबी आझाद यांच्या संसदीय राजकारणाची सुरूवात ही महाराष्ट्रातून झाली होती. त्यांच्या ३० वर्षांच्य़ा संसदीय राजकारणात ते सर्वाधीक वेळ राज्यसभेवर होते आणि फक्त दोनच टर्म ते लोकसभेवर निवडून गेले आणि तेही महाराष्ट्रातून!
तो काळ सर्वार्थाने काँग्रेसचा होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरूणांनी काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं होतं. दिवंगत नेते संजय़ गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसची घडी बसवली जात होती. संजय गांधी हे त्यावेळचे युथ आयकॉन होते. त्यांच्याप्रती असलेल्या आकर्षणापोटी आलेल्या अशाच करोडो तरूणांपैकी एक म्हणजे गुलाम नबी आझाद !
ज्यावेळी हे तरूण काँग्रेसमध्ये येत होते तेव्हा काश्मिरमध्ये शेख अब्दुल्ला हे अटकेत असल्यामुळे काँग्रेसविरोधी वातावरण होतं. अशा परिस्थितीतही महात्मा गांधी, पंडीत नेहरू, सरदार पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळे गुलाम नबी आझाद यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करण्यास प्राधान्य दिलं. त्यानंतर १९७७ साली ते पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ब्लॉक जनरल सेक्रेटरी झाले.
त्यानंतर १९८० ला संजय गांधी यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आझाद हे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण अजुनही देशाच्या संसदीय राजकारणात आझाद यांचा समावेश झाला नव्हता. काश्मिर मधील परिस्थिती पाहता तेथुन निव़डणुक लढवणं कठीण होतं. त्यामुळे मग आझाद यांना १९८० च्या लोकसभेत महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून त्यांना उमेद्वारी दिली गेली. ते तिथून एकदा नाही तर दोनदा निवडून आले पण ही निवडणूक त्यांच्या साठी काही सोपी नव्हती.
शरद पवार हे एक मोठं नाव त्यावेळी राजकारणात होतं. काश्मिरचा नेता महाराष्ट्रातुन निवडणूक लढवतो हे काही त्यांना मान्य नव्हतं. स्वतः शरद पवारांनी हा किस्सा २०२२ मध्ये राज्यसभा कार्यकाळ संपताना निरोपाच्या भाषणाता गुलाम नबी आझाद यांच्या बद्दलची ही आठवण सांगितली. शरद पवार म्हणाले, " १९८० च्या निवडणुकीची ही गोष्ट आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण ते महाराष्ट्रातील वाशिम सारख्या दुर्गम भागातून निवडणुकीला उभे राहिले. खरे तर वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नसायचे. त्याकाळात आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही ठरवलं, आझाद यांना निवडून द्यायचं नाही. त्यांना पाडायचं. आम्ही खूप प्रयत्न केला. आझाद यांच्या विरोधात प्रचाराचं रान उठवलं. पण तरीही आझाद निवडून आले. त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांचं आणि वाशिमकरांचं अतूट नातं निर्माण झालं."
गुलाम नबी यांनी १९८० सालच्या निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून तब्बल १ लाख ५१ हजार ३७८ मतांच्या फरकानं विजय मिळवला होता. त्यांना एकूण २ लाख ४५ हजार ०९१ मतं मिळाली होती. त्यानंतर १९८५ मध्ये देखील ते वाशिममधून निवडून गेले होते. महाराष्ट्रातील त्यांच्या या प्रचंड विजयानंतरही नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला हे त्यांना नेते मानायला तयार नव्हते. जम्मू-काश्मीरमध्ये आझाद यांना एक हजार मतं जरी मिळाली तरी मी त्यांना नेता म्हणेन, अशी खिल्ली अब्दुल्ला यांनी त्यावेळी उडवली होती. तेच गुलाम नबी आझाद पुढे जाऊन २००५ मध्ये तेव्हाच्या जम्मू आणि काश्मिर राज्याचे मुख्यमंत्री झाले.