मुंबई मतदारसंघ विधान परिषदेसाठी बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा

Update: 2021-11-12 03:50 GMT

मुंबई : १० डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबई मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेकडून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेते सचिन अहिर,विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी माजी आमदार सुनील शिंदे यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याही नावाची चर्चा आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सरचिटणीस आहेत. शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो. मात्र, २०२४ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा आहे. 

Tags:    

Similar News