देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार?

देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार? devendra fadnavis cabinet minister in modi government;

Update: 2021-07-02 05:01 GMT

केंद्र सरकार कॅबिनेट विस्तार करणार असल्याचं समोर आलं आहे. कोरोना काळात मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. त्यानंतर आता काही मंत्रालयातील मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचं समजतंय. मंत्र्यांचं मूल्यमापन करुन मोठे बदल केले जाणार असल्याचं समजतंय.

या संदर्भात राज्यातून देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर फडणवीस यांना माध्यमांनी सवाल केला असता फडणवीसांनी विरोधकांसह त्यांच्या पक्षातील नेत्यांना देखील उत्तर दिलं.

भाजपमध्ये पंतप्रधान मोदी जो आदेश करतात, तो आदेश शिरोधार्ह असतो. माझे शुभचिंतक आहे त्यांना वाटतेय की मला दिल्लीत काही मिळालं तर त्यांना चांगलं होईल. पण त्यांनाही सांगतोय माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं मी दिल्लीला गेलो की बला टळेल; पण बला टळणार नाही. असं म्हणत फडणवीस यांनी स्वपक्षातील नेत्यांसह विरोधकांवर देखील निशाणा साधला.

दरम्यान पुढील वर्षी उत्तर प्रदेश सारख्या राज्याची निवडणूक आहे. गेल्या 5 राज्याच्या निवडणूकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळं आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं नाही तर 2024 पर्यंत जनतेत वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळं काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्रात 81 मंत्री केले जाऊ शकतात. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात 53 मंत्री आहेत. म्हणजे अजुन 28 मंत्री पदावर खासदारांची नियुक्ती केली जाऊ शकते. केंद्रातील अनेक मंत्र्यांकडे एका पेक्षा अधिक खाते आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत असताना लसीकरणाचा वेग कमी आहे. अशा वेळी जगभरातून मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याच दरम्यान मोदी सरकारचा विस्तार होत असल्यानं आता महाराष्ट्रातून या विस्तारामध्ये कोणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

PM Narendra Modimodi, cabinet expansion, Narendra Modi cabinet, new ministers modi

Tags:    

Similar News