ओबीसी आरक्षण : राज्य सरकारच्या निर्णयावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेले आहे, यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नास टक्क्यांच्या मर्यादेच्या अधीन राहून ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारनं हा निर्णय उशिरा घेतला असला तरी तो योग्य आहे. मात्र, सरकारने हा अध्यादेश आधीच काढायला हवा होता, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. १3 डिसेंबर 2019 रोजी असा अध्यादेश काढला असता तर ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्दच झालं नसतं. मात्र सरकारला आता जाग आली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.