पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, शरद पवार यांचे प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधीवरून यांनी मोठा गौप्यस्फोट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावर शरद पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधीवरून यांनी मोठा गौप्यस्फोट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावर शरद पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit pawar) यांच्यासोबत २०१९ साली ७२ तासांचे सरकार स्थापन केले होते. त्यावर आज फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या शपथविधीची माहिती शरद पवार (Sharad pawar) यांना होती. एवढंच नाही तर आम्ही शरद पवार यांच्याशी मंत्रीपदं आणि महामंडळं याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार असल्याच्या गौप्यस्फोटाने राजकीय खळबळ उडाली. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली.
शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे विधानं ते करतील, असं वाटलं नव्हतं. तर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले की, निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणे हाच उद्देश असल्याने देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे वक्तव्य करत असतात. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. ते मुरब्बी राजकारणी आहेत. शरद पवार असे कधीही करणार नाही. ते जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.