तरुणांना व्यसनाधीन करणे हा पाकिस्तानचा छुप्या युध्दाचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
नववर्षानिमीत्त देशात पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. मात्र या तरुणांना व्यसनाधीन करण्यामागे पाकिस्तानचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.;
नववर्षानिमीत्त देशात पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. मात्र या तरुणांना व्यसनाधीन करण्यामागे पाकिस्तानचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नववर्षात मोठ्या प्रमाणावर पार्ट्या केल्या जातात. यामध्ये अनेक व्यसनं केली जातात. त्याबाबत बीड येथे बोलताना हा छुप्या युध्दाचा एक भाग असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांनी 31 डिसेंबर रोजी तरुणांच्या पार्ट्या आणि व्यसनाधीनता लक्षात घेता व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे एखादा समाज लयाला जाण्यास त्या समाजातील सुखासीनता आणि व्यसनाधीनता कारणीभूत असते. त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशाकडून आपल्या देशात तरुणांना व्यसनात अडकवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तरुणांना व्यसनाधीन करणे हा एका छुप्या युध्दाचाच भाग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.