'संजय राऊत व्हीक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतायत'संजय राऊतांच्या आरोपाला फडणवीसांचं उत्तर

Update: 2022-02-09 10:00 GMT

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नकतेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडु यांना पत्र लिहुन ईडी आपला छळ करत असल्याचे म्हटले आहे.महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं होतं.यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

संजय राऊत व्हीक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंह गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही,मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जात नाही.संजय राऊतांच वक्तव्य हेडलाईन्ससाठी आहे, ते संपादक आहे.कोणत्या वक्तव्याची बातमी होणार हे त्यांना माहिती आहे.त्यामुळेच ते अशी वक्तव्य करतात.असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्याहून मोठा बॉम्ब फोडला. संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. तुम्ही पाहत राहा फक्त याचे सुत्रधार कोण आहेत याचा नकाब लवकरच उतरवू. बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत. ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना? मग हे दोन-तीन लोक, कार्यालयात बसतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात. काय करायचंय? कोणाला बोलवायचं? कोणाला टॉर्चर करायचं? मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि मला काय सांगायचंय ते त्यांना माहिती आहे."

Tags:    

Similar News