अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस दिल्लीत...

शरद पवार ही दिल्लीत… चर्चांना उधाण

Update: 2022-03-15 11:30 GMT

सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात सरकारला घेरण्याची एकही संधी सोडलेली नाही. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी असो अथवा फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे केलेले स्टींग ऑपरेशन असो. यामुळे मविआ सरकार अडचणीत सापडले आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अधिवेशन सोडून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. त्यातच संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार ही दिल्लीत आहेत. नवाब मलिक आणि पेनड्राइव्ह प्रकरणाने महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याने वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

त्यामुळे राज्यात पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र, फडणवीस यांची ही भेट नियोजीत असून गोव्यातील मुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी केंद्रीय समितीची बैठक पार पडत आहे. फडणवीस हे गोव्याचे प्रभारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं फडणवीस अधिवेशन सोडून तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत.

गोव्यात विश्वजीत राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळं या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. गोव्यात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे. भाजपला 40 पैकी 19 जागांवर विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली होती. म्हणून त्यांच्याच गळ्यात गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News