वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस खडाजंगी
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. त्या आरोपांचे आदित्य ठाकरे यांनी खंडन केले आहे.;
वेदांता प्रकल्प (Vedanta foxconn) जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. या टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
2020 मध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येत नसल्याचे तात्कालिन उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी म्हटले होते. त्याबाबत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी बातमीचा पुरावा दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी झालेल्या बैठकांच्या तारखा आणि झालेले एमओयूचे कागदपत्रं सादर केले. त्यामुळे वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे विरुध्द फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले.