ज्यांचा रिफायनरीला विरोध त्यांना गुंतवणूकीवर बोलण्याचा अधिकार नाही- देवेंद्र फडणवीस
नागपूर येथे होणारा टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्र सोडले होते. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;
टाटा एअर बस प्रकल्प (Tata Air bus project) गुजरातला (Gujrat) गेल्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणाले की, पुणे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (Electronics Manufacturing cluster) मंजूर झाले आहे. यामुळे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामाध्यमातून 5000 रोजगार निर्मीती होणार आहेत. मात्र काही नेते आणि पत्रकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे माझा त्यांना प्रश्न आहे की, ज्यांनी रिफायनरीला विरोध केला त्यांना गुंतवणूकीवर बोलण्याचा अधिकार आहे का?
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ज्यांनी फॉक्सकॉनबाबत (vedanta) चुकीचा प्रचार केला असेल तर मग सुभाष देसाई यांनी 2 जानेवारी 2022 रोजी फॉक्सकॉन राज्यात येणार नाही, असं का सांगितलं होतं.
टाटा एअरबस प्रकल्प 2021 मध्ये गुजरातमध्ये नियोजित झाला होता पण खापर आमच्यावर फोडले जात आहे. टाटा यांच्याशी संबंधित व्यक्तीने मला घरी बोलवून महाराष्ट्रातील वातावरण उचित नसल्याचे सांगितले होते, असंही फडणवीस म्हणाले.