Devendra fadnavis Vs Aditya thackeray : बल्क ड्रग्ज पार्कवरून आरोप प्रत्यारोप
रायगड येथे होणारा बल्क ड्रग्ज प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे.;
बल्क ड्रग्ज पार्कवरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बल्क ड्रग्ज पार्कवरून उत्तर दिले आहे. त्यामध्ये बल्क ड्रग्ज पार्क महाराष्ट्राबाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढताना सुभाष देसाई यांनी केलेले ट्वीट आणि निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या भेटीचे ट्वीट सादर केले. त्यामुळे राज्यात महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे.