भाजपमध्ये घरातील व्यक्तीसाठी कोणत्याही नेत्याने तिकीट मागू नये, नाहीतर त्याला मी स्वत: विरोध करेन, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नागपूरमध्ये त्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमातील भाषणात गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले. एखाद्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून त्याला तिकीट मिळणार नाही, तर जनतेने मागणी केली तरच तिकीट दिले जाते, असे गडकरी यांनी सुनावले.