गजानन काळे यांना अटक व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या महिला आक्रमक

मनसेचे गजानन काळे यांनी त्यांच्या पत्नीवर अत्याचार केला, गजानन काळेंवर गुन्हा दाखल झाला मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही म्हणून महाविकास आघाडीच्या महिला आक्रमक झाल्या आहेत.;

Update: 2021-08-16 12:13 GMT

नवी मुंबई : मनसेचे गजानन काळे यांनी त्यांच्या पत्नीवर अत्याचार केला, गजानन काळेंवर गुन्हा दाखल झाला तरी सुध्दा गजानन काळेंना अटक का नाही झाली? त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि संजीवनी काळे यांना न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व महिलांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना , राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या महिलांची उपस्थिती दिसून आली.

एकविसाव्या शतकात सुद्धा महिलांवर अत्याचार होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. गजानन काळे यांनी त्यांच्या बायकोवर जो अन्याय अत्याचार केलेला आहे. याबाबत पोलिसांना सर्व माहित असून त्यांनी अजून कठोर कारवाई केलेली दिसत नाही.

या गोष्टीला आता सहा दिवस होऊन गेले, तरी सुद्धा गजानन काळे यांना अटक का नाही झाली?असा सवाल या महिलांच्या शिष्टमंडळाने उपस्थित केला. गजानन काळे यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल असून सुद्धा त्यांना अटक का नाही झाली? असं म्हणत महाविकास आघाडीच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने सहा दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते.गजानन काळे आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे म्हणत संजीवनी काळे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. एवढे गंभीर आरोप असताना देखील त्यांना अद्याप अटक झालेली नाही.दरम्यान महाविकास आघाडीतील महिलांनी याबाबत थेट गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेतल्याने आता गजानन काळे यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News