राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेतही पराभवाचा धक्का बसलेल्या महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ११ आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त येत आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. पण आता नाराज असलेले एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह गुजरातमध्ये गेले आहेत अस सुद्धा म्हंटल जात आहे.
एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे म्हंटले जात आहे त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याच सुद्धा म्हंटल जात आहे. एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असलेल्या बतमीनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केला आहे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एकनाथ शिंदे साहेब भाजपात जाणार हे म्हणणार यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही अस म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. ते व त्यांच्या संपर्कातील काही आमदार अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे. मी सगळ्या चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केला आहे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माननीय.एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही.