शरद पवारांची चाकरी आणि मातोश्रींची भाकरी खातात संजय राऊत : दादा भुसे

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्यावर विधिमंडळात घोटाळ्याचा आरोप केला. सभागृहात दादा भुसे यांनी संजय राऊत यांचे ट्विट वाचून दाखवले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची चाकरी करतात आणि मातोश्रीची भाकरी खातात असा आरोप संजय राऊत यांच्यावर केला. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार संतप्त झाले आणि म्हणाले तुम्ही वाटेल ते बोल पण पण शरद पवारांचा उल्लेख तुम्ही करायला नको होता.;

Update: 2023-03-21 11:36 GMT

संजय राऊत यांचे ट्विट

सोमवारी (20 मार्च) रात्री संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला. दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो व्यवसायात मोठा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. ते ट्विटमध्ये पुढे म्हणाले की, "शेतकरी रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध करत आहेत. गिरणा अॅग्रोचे 178 कोटी 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून घेतले. पण तरीही 1 कोटी 67 लाख शेअर्ससाठी फक्त 47 सदस्यांच्या नावावार दाखवली आहेत. ही लूट आहे, लवकरच स्फोट होईल…"."

भाकरीची मातोश्रीची, आणि चाकरी शरद पवारांची , महागद्दार संजय राऊत : दादा भुसे

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे दादा भुसे संतापले. सभागृहात त्यांनी संजय राऊत यांचे ट्विट वाचले. तेव्हा दादा भुसे हे संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, "आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले.

ते जे बोलले ते खरं असेल तर कारवाई करायला हवी, नाही तर संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. मातोश्रीची भाकरी खाताना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल.

शरद पवारांचा उल्लेख होताच अजित पवार आक्रमक...

दादा भुसे यांनी शरद पवार यांचे नाव घेतले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झालेले दिसून आले. "दादा भुसे यांनी आपले मत मांडताना शरद पवारांचा उल्लेख करणं योग्य नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, दादा भुसे, तुम्ही त्वरित माफी मागावी," असे अजित पवार म्हणाले. तर दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते अनेक प्रसारमाध्यमांमध्ये गेलेलं आहे.

मी कधीही शरद पवारांचा अपमान केला नाही : दादा भुसे

दादा भुसे म्हणाले की, मी शरद पवारांबद्दल वाईट काहीही बोलले नाही. मी सहज नमूद केले की संजय राऊत शरद पवार यांची चाकरी करतात . अध्यक्ष महोदय, कृपया तपासा. मी वाईट अजिबात बोललो नाही.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष ?

त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रति उत्तर देताना सांगितले की, दादा भुसे जे काही बोलले याचा आढावा घेतला असून, रेकॉर्डवरून काढण्याची कारवाई केली जाईल.

Tags:    

Similar News