आकडेबाजी व जुमलेबाजी सरकारचा नेहमीच खेळ; महागाईच्या मुद्द्यावरून सामनातून केंद्रावर निशाणा

Update: 2021-10-14 02:38 GMT

मुंबई  : 'महागाईची जुलमेबाजी' असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला. पोटाची खळगी कशी भरायची? आधीच कोरोनाचा मार त्यात दरवाढीचा भडीमार कसा सहन करायचा या विवंचनेत मध्ये सामान्य माणूस आहे, सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची 'गाजरे' खुशीत खात आहे असा घणाघात आजच्या सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आला.

सोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था यावर्षी 9.1 पाच टक्के दराने वाढणार , 2022 मध्ये विकास दरात हिंदुस्थान जगाला मागे टाकणार असे आणखी एक गाजर दाखवले आहे. ही देखील एक प्रकारचे आकडे बाजीचा आहे. आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे अशी टीका आजचा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेल मात्रवास्तविक पाहता दरवाढीचा आकडा रोजच वाढत चालला आहे त्याचे काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला. ऑगस्ट महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर हा 5.3 टक्के होता आता तो 4.45 टक्क्यांवर आला आहे. केंद्राच्या नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने ही टक्केवारी जारी केली आहे. एप्रिल 2020 नंतरचा हा सर्वात कमी दर आहे असे सांगण्यात आले आहे, शिवाय खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत असाही सरकारचा दावा आहे. यामुळे खाद्य महागाई 3.11% वरून 0.68 टक्के एवढी घसरले आहे असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारी कागदावर आकडेवारीची तलवारबाजी नेहमीच सुरू असते पण सरकारी माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात अनेकदा जमीन-अस्मानाचा फरक असतो असं सामनातून म्हटलं आहे.हे सरकारी आकडे ऐकले की सामान्य माणसाला आकडी येते असा घणाघात सामनातून करण्यात आला.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोज नवे नवे विक्रम करत आहे स्वयंपाकाच्या गॅस दरात देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही आता प्रतिलिटर शंभरी ओलांडली आहे. घरगुती घरगुती गॅसचे दर मजल दर मजल करत एक हजार रुपयांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. असे असताना महागाई कमी कशी झाली असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

इतरही अन्नधान्याच्या किमती वाढलेल्याच आहे , भाजीपाला फळ हे देखील स्वस्त व्हायला तयार नाही. त्यात मागील महिन्यातील ढगफुटी , अतिवृष्टी महापूर यामुळे हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक नष्ट झाले आहे. सोयाबीन कापूस डाळी कडधान्य उध्वस्त झाले आहे, या परिस्थितीमुळे भाज्या- फळे यांचे बाजारातील भाव वाढले आहेत. सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेलपण वास्तवात दरवाढीचा आकडा रोज वाढतच चालला आहे असं सामनातून म्हटलं आहे.

Tags:    

Similar News