केवळ आरोपांमुळे नागरी अधिकारांचा संकोच करणं लोकशाहीला घातक : यशोमती ठाकूर

Update: 2022-06-20 11:28 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही मतदानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विधान परिषदेच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात तरी त्यांना परवानगी मिळेल अशी आशा पक्षाला होती. पण सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना दिलासा देण्यास नकार दिला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते आहेत. यामुळे महाविकास आघाडीची दोन हक्काची मतं कमी झाली आहेत.

पण यापूर्वी छगन भुजबळ आणि रमेश कदम यांना कैदेत असतानाही मतदानाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांनाही परवानगी द्यावी असा युक्तीवाद करण्यात आला. पण कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळत कैद्यांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

दरम्याव याच मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. तसेच केवळ आरोप झाले म्हणून कुणाचा मतदानाचा अधिकार डावलणे योग्य नसल्याची टीका केली आहे. त्यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. " आमचे वरिष्ठ सहकारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानाचा अधिकार नाकारला जाणं दुर्दैवी आहे. केवळ आरोपांमुळे नागरी अधिकारांचा संकोच केला जाणं लोकशाही साठी घातक प्रथा ठरू शकते. लोकसभा आणि राज्यसभेने याची दखल घेऊन मार्गदर्शक तत्वे आखून देण्याची गरज आहे." अशी व्यापक भूमिका त्यांनी मांडली आहे.

सहकारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानाचा अधिकार नाकारला जाणं दुर्दैवी आहे. केवळ आरोपांमुळे नागरी अधिकारांचा संकोच केला जाणं लोकशाही साठी घातक प्रथा ठरू शकते. लोकसभा आणि राज्यसभेने याची दखल घेऊन मार्गदर्शक तत्वे आखून देण्याची गरज आहे.#NawabMalik#AnilDeshmukh

— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) June 20, 2022

Tags:    

Similar News