शेवटी काँग्रेसने बोलावली CWC ची बैठक, कॉंग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार का?

Update: 2021-10-10 09:08 GMT

गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते सातत्याने कॉंग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक बोलावण्याची मागणी करत आहेत. अखेर त्यांची ही मागणी कॉंग्रेस नेतृत्वाने पूर्ण केल आहे.

पक्षाचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. "कॉंग्रेसचे सर्व निर्णय घेणाऱ्या संस्थेची बैठक 16 ऑक्टोबर ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात दिल्ली येथे आयोजित केली आहे." असं ट्वीट के.सी. वेणुगोपाल यांनी केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कॉंग्रेस अंतर्गत मोठा वाद असल्याचं दिसून येते. पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तासंघर्ष होतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचं राजकारण अजूनही पक्षासाठी डोकेदुखीचा विषय बनलेलं आहे.

नवज्योतसिंह सिद्धू यांच्या वाटचालीमुळे काँग्रेस पुन्हा सत्तेत येणं कठीण होईल. दरम्यान, कॉंग्रेसमध्ये घडणाऱ्या या सगळ्या घडामोडीबाबत काँग्रेस नेतृत्वाला जी -23 गटाच्या नेत्यांनीही सतत निवेदन दिली आहेत. दरम्यान, काँग्रेस हायकमांडवर नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आणि संघटनेमध्ये निवडणूका घेण्यासाठी काँग्रेस नेते दबाव टाकत आहेच.

सोनिया गांधी यांनी त्यांना आता काँग्रेस अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा नाही. राहुल गांधी अध्यक्ष होण्यास तयार नाहीत. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुका त्यांच्या समोर येऊन थोपल्या आहेत. अनेक मोठे नेते सतत पक्ष सोडत आहेत. G-23 गटाचे नेतेही आता कॉंग्रेस नेतृत्वावर दबाव वाढवत आहेत. अशा परिस्थितीत हायकमांडला मोठ्या मुद्द्यांवर त्वरित निर्णय घ्यावा लागणार आहे.

आत्तापर्यंत नेतृत्वाच्या मुद्यावर काँग्रेसचे अनेक नेते उघडपणे बोलले आहेत. ज्यामध्ये, अभिषेक मनु सिंघवी, शशी थरूर, कपिल सिब्बल आणि संदीप दीक्षित यांचा समावेश आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलन, पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधी खूप सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पक्षाला नीटनेटकं करून पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरवावे लागेल, अन्यथा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपला आव्हान कठीण होणार आहे.

Tags:    

Similar News