काँग्रेस चं राजस्थानमधील उदयपूर येथे सुरू असलेल्या चिंतन शिबिराचा आज शेवटचा दिवस आहे. ५ राज्याच्या पराभवानंतर पक्षाने काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत. या प्रस्तावांना उदयपूर डिक्लेरेशन या नावाने घोषित करण्यात येणार आहे.
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला तिकिट मिळणार
दुसऱ्या सदस्याने पक्षासाठी सलग ५ वर्षे काम करावे लागेल.
काँग्रेस च्या संघटनेत एका पदावर ५ वर्षे काम केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळणार नाही. त्यासाठी ३ वर्षाचा कुलिंग टाइम लागेल.
शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाणार
देशातील प्रत्येक राज्यात पक्षाची व्यवहार समिती असेल.
MSP कायदा करणे. यापुढे शेतकऱ्यांची पीक MSP शिवाय खरेदी करता येणार नाहीत.
पक्षातील एकूण पदांपैकी ५० टक्के पद हे ५० वर्षे वयोगटातील नेत्यांना दिले जातील
काँग्रेस वर्कीग कमिटी च्या व्यतिरिक्त एक उपसमिती स्थापन करणार… ही समिती काँग्रेस अध्यक्षाला सल्ला देणार
G 23 नेत्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे राजकीय घडामोडी समिती स्थापन केली जाईल, या समितीचे सदस्य CWC मधील सदस्य असतील. काँग्रेस अध्यक्षाला महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर ही समिती सल्ला देईल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली.
शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं जाईल त्यानंतर शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल.
निवडणूकांसाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला जाईल
सत्तेत आल्यास EVM वर बंदी, त्यानंतर मतदान पत्रिकेवर मतदान घेतल जाईल…