जासूसी करण्याचे काम काँग्रेसचे नाही तर केंद्र सरकारचे – पटोले

काँग्रेस सरकारची जासूसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करतंय असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.;

Update: 2021-08-01 05:36 GMT

पुणे : पूरबाधित भागाचा दौरा करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती, या भेटीबाबत काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही काँग्रेस सरकारची जासूसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करतंय असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.पुण्यातून नाना पटोले यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यातील सारसबाग चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत नाना पटोले यांनी पूरबाधितांसाठी मदत पाठवली. यावेळी बोलतांना केंद्र सरकारवर टीका केली , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा आहे ते काय मदत करतात ते पाहू, वादळाच्या वेळेस त्यांनी गुजरातला भेट दिली. मात्र महाराष्ट्राला काही त्यांनी भेट दिलेला नाही. त्यामुळे आता पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील हे पाहावे लागेल असं पटोले यांनी म्हटलं आहे.

देशात सुईपासून ते रॉकेट बनवण्याचे काम काँग्रेसने केले

दरम्यान मेट्रो बाबत भाजपकडून श्रेयवाद केला जात असल्याबाबत विचारले असता, पृथ्वीराज चव्हाण जेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेंव्हाच मेट्रोचा पाया घालण्यात आला होता. त्यामुळे त्यांना भाजपला श्रेय घ्यायचे तर घेऊ द्या जनतेला सर्व माहिती आहे. असं पटोले यांनी म्हटलं आहे. त्याबरोबर त्यांनी म्हटलं की, जेंव्हा देशात सुई पासून तर रॉकेट बनवण्यापर्यंत काम हे काँग्रेस सरकारच्या काळातच झाले. खऱ्या अर्थाने काँग्रेसने देशाला महासत्ता बनवले. भाजपने केवळ श्रेय घेण्याचे काम केले असे असं पटोले म्हणाले . सोबतच मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहे असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

Tags:    

Similar News