काँग्रेसने केले RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे अभिनंदन
नेमही RSS आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या काँग्रेसने थेट RSS प्रमुख मोहन भागवत यांचे अभिनंदन केले आहे. पहा नेमकं काय आहे कारण?;
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केल्यानंतर काही दिवसातच RSS प्रमुख मोहन भागवत यांनी मुस्लिम इमामांची भेट घेतली. त्यामुळे मोहन भागवत हे राहुल गांधी यांची एकात्मतेची भुमिका पुढे नेत असल्याचा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोहन भागवत यांचे अभिनंदन केले आहे.